Sujay Jibberish
लेखक | रॅपर | कवी | नाटककार | स्क्रीनरायटर

Latest Release
माझ्या कथेवर आधारित असलेली, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार जिंकलेली 'Woong Woong'
ही शॉर्टफिल्म युट्युबवर नुकतीच रिलीज झाली आहे.
Rapper
रॅपमधे मी मॅड सायंटिस्टसारखे वेगवेगळे प्रयोग करतो. प्रयोगशाळेत बरीच उलथापालथ चालू आहे. तूर्तास हे ऐका-


Writer
'जिब्रिश कथा' या नावाने मी एक अब्सर्ड कथामालिका लिहितो. ती नुकतीच पुस्तकरूपात प्रकाशित झालीय. पुस्तकाचं नाव 'जिब्रिश कथा'च आहे. सध्या एका कादंबरीवर काम सुरू आहे. Existential Crisis आणि आयुष्यातली अब्सर्डिटी शोधण्याच्या मार्गावर असणारी ही कादंबरी आहे.
Playwright
प्रायोगिक आणि समांतर रंगभूमीवर माझी अनेक नाटके मंचित झाली आहेत. 'हायपरबोला' आणि 'तोडी मिल फँटसी' ही लेटेस्ट नाटके.
तोडी मिल फँटसीचे प्रयोग सुरू आहेत. हायपरबोला मंचित होण्याच्या मार्गावर आहे.


Screenwriter
'चिठ्ठी' (२०१८) या सिनेमाची पटकथा आणि संवाद मी लिहिले होते. आता माझा 'ये रे ये रे पैसा ३' नावाचा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी येतोय. या सिनेमाची पटकथा मी लिहिली आहे आणि कथेतही माझा हातभार आहे.
Screenwriter
माझ्या तीन शॉर्टफिल्म्स प्रकाशित झाल्या आहेत. 'भूक', 'कट्टी' आणि 'Woong Woong'. तिन्ही शॉर्टफिल्म्स युट्यूबवर तुम्ही पाहू शकता.


Lyricist
आजवर बऱ्याच प्रोजेक्ट्ससाठी मी गाणी लिहिली. काही प्रोजेक्ट्स पूर्ण झाले, काही डब्यात गेले. २०१८ साली आलेल्या 'लुज कंट्रोल' या सिनेमात मी दोन गाणी लिहीली, त्यापैकी 'भरारी' या गाण्याला मिरची म्युझिक अवॉर्ड मिळाला. लेटेस्ट आहे भाडिपा आणि यशराज मुखाटेसोबत केलेलं 'दिन दिन दिवाळी.' ज्याला 9M+ व्ह्यूज आहेत.
उत्सुकतेने मी बोअर झालो...
मी पूर्णवेळ लेखन आणि रॅप करतो. चित्रपट, रॅप, नाटक, कथा, कादंबरी असं बरंच लिखाण एकाचवेळी चालू आहे. माझ्या कलेचं स्वरूप आतून स्वान्तसुखाय आणि बाहेरून कमर्शियल असं आहे. माझ्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर इथे साधू शकता-
संपर्क: +९१ ८०९७५ ३४१२८
ईमेल: [email protected]
